सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला ‘हा’ बहुमान 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या चार राज्यातील १४० विद्यापीठाचा मिळून साकार होणाऱ्या युवा मोह्त्सवाचा यजमान पदाचा बहुमान या वर्षी पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या युवामोहत्वात वरील चार राज्यातील एकूण दोन हजार कलाकार सहभागी होणार आहेत. पुणे विद्यापीठासाठी हा मोठा महत्वाकांशी कार्यक्रम असून चोख नियोजनावर विद्यपीठाकडून भर दिला जाणार आहे असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेची मंगळवारी बैठक पार पडली यात कार्यक्रमाच्या खर्चावर विचार विमर्श करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी होणाऱ्या एकूण खर्च पैकी निम्मा खर्च विद्यापीठाच्या कोठ्यातून केला जाणार असून निम्म्या खर्चासाठी प्रायोजक शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कार्यक्रमाचे यजमान पद मिळण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीजकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता तो प्रस्ताव मंजूर झाल्यामुळेच पुणे विद्यापीठाला कार्यक्रमाच्या आयोजनाचे यजमान पद देण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाचा युवा मोहत्सव नुकताच पार पडला यात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये मरगळ आल्याचे दिसून आले आहे हि मरगळ झटकण्यासाठीच या कार्यक्रमाचे यजमान पद घेण्यात आले आहे असे सांगण्यात येते आहे. विद्यापीठात नेहमी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते परंतु चार राज्याच्या २७ कलाविष्काराचा उत्तम कार्यक्रम बघण्याचा योग पुण्यामध्ये येणार आहे. या कार्यक्रमा बद्दल विद्यापीठातील मुलांना उत्सुकता लागली आहे.

कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार असून महाराष्ट्राच्या संस्कृती बरोबरच गोवा ,गुजरात,आणि राजस्थानच्या संस्कृतीचा हा दर्शन सोहळाच असल्याचे बोलले जाते आहे. विद्यापीठाच्या परिसरात होणारा हा पहिलाच आंतरराज्यीय मोहत्सव असून या कार्यक्रमाच्या आयोजनावरच येत्या काळात विद्यापीठाला बाहेरील राज्यात लौकिक प्राप्त होणार आहे. मागच्या काळात पुणे विद्यापीठ हे देशाच्या पहिल्या दहा विद्यापीठाच्या यादीत समाविष्ठ झाल्याने देशाचा देशभर नव्याने लौकिक झाला आहे. त्या लौकिकाला साजेसा कार्यक्रम आम्ही करणार असल्याचे विद्यापीठच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.