केरळ पुरग्रस्तांकरिता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा पुढाकार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
केरळमध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला आहे. केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर  मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यातर्फे निधी स्वरूपात  मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
संपूर्ण देशभरातून पूरग्रस्त केरळ करिता मदत केली जात असताना विद्यापीठातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यानी देखील सामाजिक जाणिवेतून केरळ करिता निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानंतर निधी गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले . हे काम पुढे व्यापक होत गेले . २०१८ हे वर्ष विद्यापीठातील इतिहास विभागाच सुवर्ण महोत्सवी वर्ष…! सर्वप्रथम ५० हजार रुपये निधी जमा करण्याचे ठरवले होते. मात्र हळूहळू विद्यापीठातील इतरही विद्यार्थी या मोहिमेत जोडले गेले.
पुणे विद्यापीठ गेट सिग्नल, खडकी स्टेशन, शिवाजीनगर, अप्पा बळवंत चौक इथे सलग ३ दिवस सर्वानी हे मदत जमा करण्याचे काम केल. १ लाखाहुन अधिक निधी जमा केला गेला. मा कुलगुरु डॉ नितिन करमळकर यांच्या , आणि NSS समन्वयक डॉ देसाई यांच्या  उपस्थितीत हा निधी विद्यापीठाकडे जमा केला. तिथून हा निधी आपत्तीग्रस्तांना पोहचेल.
हा निधी गोळा करण्याच्या कामात विभागप्रमुख डॉ. राधिका सेशन , डॉ.श्रद्धा कुंभोजकर  प्रा. बी एच दुधभाते , प्रा.जुनैद शेख  यांनी खुप प्रोत्साहन दिले, त्यातून अधिकच उत्साह वाढला. पुणेकरांची दानशुर वृत्तीही यानिमित्ताने दिसली. केरळमधील आपल्या बांधवाना मदतीची नितांत गरज असताना आपण छोटी का होईना करू शकलो याच समाधान आहे.
[amazon_link asins=’8192910962,9351772071′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’73a02cd2-a54a-11e8-9717-935a28cf1fc3′]