Pune Unlock | अखेर पुण्यातील निर्बंध शिथिल ! वीकेंड लॉकडाऊनही रद्द, दुकाने दिवसभर तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु; मात्र अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील निर्बंध अखेर शिथिल (Pune Unlock) करण्यात आल्या असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील सर्व दुकाने (shops) सर्व दिवशी सकाळपासून रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी (Pune Unlock) देण्यात आली आहे. तर शहरातील हॉटेल्स (hotels) रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील मॉलही (mall) उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

विकेंड लॉकडाऊन रद्द

पुण्यातील विकेंड लॉकडाऊन देखील रद्द (Weekend lockdown cancel) करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी दिवशी आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 7 टक्के झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे. ग्रामीण भागात (rural area) मात्र चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.

तर पुन्हा कडक नियम लागू करणार

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील निर्बंधात सूट देत अजित पवार यांनी दुकानाच्या वेळा वाढण्याबरोबरच हॉटेल आणि अन्य आस्थापना यांनाही सूट दिली आहे. पण दोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील. दुकानांचे मालक, सेल्समन यांच्या बाबत तक्रार येते की मास्क वापरत नाहीत, असे होता कामा नये. कुठलीही चूक होत कामा नये. सहा दिवस 8 पर्यंत दुकानं सुरु राहतील. मालक, सेल्समन यांनी दोन्ही लस घेतलेलेच असले पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

PM Kisan | खुशखबर ! उद्या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव

जलतरण सोडून सर्व गेम सुरु

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी 50 टक्केने सुरु राहतील. जलतरण (Swimming) सोडून सगळे गेम सुरु राहतील. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग (Social distance) पाळणे गरजेचे आहे. मॉल रात्री 8 पर्यंत सुरु राहतील. दर 15 दिवसात स्टाफचं मेडिकल तपासणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

धार्मिक स्थळं बंदच

राज्यातील शाळांबाबतीत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये चर्चा करणार आहे. राज्यातील धार्मिक स्थळांविषयीचा निर्णय हा राज्य सरकार घेते. तो निर्णय राज्यासाठी असतो. राज्य सरकारच्या बैठकीत धार्मिक स्थळाविषयी जो निर्णय घेतला जाईल तोच पुण्याच्या बाबतीत देखील लागू असणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

ग्रामीणचा निर्णय पुढील आठवड्यात

पुण्यातील प्रमाण 3.3 आणि पिंपरी चिंचवड 3.5 तर ग्रामीणचं 5.5 आहे. ग्रामीणचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आंबेगावात 6 टक्के, बारामती 4.3, भोर 2.9, दौंड 7.2, इंदापूर 6.5, जुन्नर 7.2, खेड 5.5, मावळ 4.9, मुळशी 3.4, पुरंदर 6.1, शिरुर 7.1 येथेही निर्णय घेतले जातील. येथील रुग्णांचे प्रमाण कमी झालं की निर्बंध शिथिल केले जातील. याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! उद्या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव

Pune Crime | सेवानिवृत्त सैनिकाच्या फ्लॅटमध्ये घरफोडी, बंदूक आणि 5 जिवंत काडतुसासह 7 लाखांचा ऐवज लंपास

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Unlock | Restrictions in Pune finally relaxed! Weekend lockdown also canceled, shops open all day while hotels open until 10pm; But Ajit Pawar gave this warning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update