Pune : पुण्यातील सुरक्षा रक्षकाकडून भटक्या श्वानावर अनैसर्गिकरित्या अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   उच्चभ्रू परिसर असणाऱ्या मॉडेल कॉलनीत सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने भटक्या श्वानावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका प्राणी मित्राच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला आहे.

बाबुराव भाऊराव मोरे (वय 65, रा. जनता वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पल्लवी भैरप्पा गौडा (वय 28) यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनीत एका सोसायटीत बाबुराव मोरे हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत. सोसायटीच्या गेटवर बसणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये उचलून नेले. त्यानंतर आदबाजूला नेहून त्याच्यावर अत्याचार केले होते. मात्र कोणीतरी पाहात असल्याचे लक्षात आल्याने त्याने त्या कुत्र्याला सोडून दिले. त्यानंतर गौडा यांनी सुरक्षा रक्षकावर पाळत ठेवली होती. दरम्यान शनिवारी पुन्हा आरोपीने एका भटक्या कुत्र्याला उचलून घेऊन जात त्याच्याशी अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.