Pune Vehicle sales | पुण्यात 6 महिन्यांत 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यात सहा महिन्यामध्ये जवळपास 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री (Pune Vehicle sales) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये टुव्हिलर (Two-wheeler) 35 हजार 622 आहेत. तर फोरव्हिलर (Four wheeler) 22055 आणि इतर वाहनांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ही वाढ मोठ्या प्रमाणात आहे. यानूसार 322 पुणेकरांच्या घरी नव्या वाहनांचे आगमन झाले आहे. खरंतर यंदा फोरव्हिलर मध्ये कमतरता दिसून आली. तरीही फोरव्हिलरची विक्री संख्या 22 हजाराहून जास्तच आहे. (Pune Vehicle sales)

प्रवाशांनी कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर खासगी वाहनांना (Private vehicles) अधिक पसंती दिली. या कारणावरुन खासगी वाहनांच्या विक्री संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं. एप्रिल ते सप्टेंबर (April to September 2021) दरम्यान पुणे आरटीओ कार्यालयात (Pune RTO Office) नोंद झालेल्या आकडेवारीनुसार टुव्हिलर 35, 622 तर फोरव्हिलर 22055 इतक्या वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टुव्हिलरमध्ये 19 हजार 500 तर फोरव्हिलर मध्ये 13 हजार 369 वाहनांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. (Pune Vehicle sales)

दरम्यान, गतवर्षीच्या आकडेवारीनुसार पुण्यामध्ये सर्व वाहनांचा विचार केला तर साधारण 40 लाख वाहने आहेत. यामध्ये आता 63 हजार वाहनांची भर पडली आहे. तर, ऑक्टोबर ते डिसेंबर (October to December) दरम्यान वाहन विक्रीची माहिती यामध्ये नाही. तर ती संख्या असती तर वाहनांच्या विक्रीने लाखाचा टप्पा ओलांडला असता. दरम्यान, गतवर्षी पुण्यात फक्त 17 रिक्षांची (Auto) विक्री झाली होती. यावर्षी त्याच्या विक्रीचा आकडा 924 पर्यंत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका (Ambulance) 4 वरुन याचा आकडा वाढून 78 झाला आहे.

Web Title : Pune Vehicle sales | sales 63 thousand two wheelers and four wheelers and other vehicles pune six months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर