पुण्यातील सिंहगड रोड परिसरात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरातील धायरीत टोळक्याने दहशत माजविण्यासाठी पार्किंग केलेल्या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांचे खळखट्याक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

साहिल बशीर शेख (वय 19), सैफल आजुमल हुसेन (वय 19), सिद्धार्थ सोनबा पोकळे (वय 20), ओम गोरख पाटील (वय 19 सर्व रा. धायरी ) असे जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भैरवनाथ पाटील (वय 39, रा. जिजाईनगर, धायरी ) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ यांनी घराजवळील रस्त्यावर मोटार पार्क केली होती. त्यानंतर गुरूवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास साहिल, सैफल, ओम, सिद्धार्थसह इतर साथीदारांसह येथे आला. त्याने आरडा-ओरड करीत वाहनांची तोडफोड केली. तसेच परिसरात दहशत माजवून गोंधळ घातला. अचानक झालेल्या या प्रकारमुळे परिसरात चांगलीच दहशत माजली होती. माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. त्यानंतर चौघांचा शोध घेऊन त्यांना पकडले. अधिक तपास उपनिरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.