पुण्यात पावसाचा ‘हाहाकार’ ! मृतांचा आकडा 12 वर, महिला दुचाकीसह गेली वाहून

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4 जण बेपत्ता आहेत. बुधवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या अमृता आनंद सुदामे या दुचाकीसह वाहून गेल्या. अमृता सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जात असताना पाण्याचा जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अमृता सुदामे यांच्या बहीण निशा वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास कामावर गेली होती. रात्री साडे दहाच्या सुमारास ती घरी येते. मात्र, बराच वेळ झाला तरी ती घरी न आल्याने आम्ही तिचा शोध घेतला. ति सापडली नसल्याने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना ति बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर 8 तासानंतर सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या पश्चात दोन मुली असून पती मुंबई येथे कामानिमित्त गेले होते.

बुधवारी झालेल्या पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. तर पाण्याच्या प्रवाहात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. बुधवारच्या पावसामुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली. आज देखील पुण्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Visit : policenama.com