Pune | हॉटेल वैशालीचे जगन्नाथ शेट्टी यांचे निधन; पुण्यातील रेस्टॉरंट व्यवसायाचा ‘अग्रणी’ हरपला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune | पुण्यातील रेस्टॉरंटच्या व्यवसायातील अग्रणी आणि हॉटेल वैशाली रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा जगन्नाथ बी शेट्टी (Owner of Hotel Vaishali Jagannath B. Shetty) यांचे वृद्धापकाळामुळे आज सकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Pune)

 

जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९३२ मध्ये दक्षिण कणारातील करकल्लाजवळील बैलूरमधील ओनिमाजालू माने येथे झाला. ते वयाच्या १३ व्या वर्षी काकाकडे कल्याणाला कामाला आले. तरुण जगन्नाथ शेट्टी हे १९४९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी पुण्यात (Pune) आले आणि पुणेकर होऊन गेले. त्यांनी १९५१ मध्ये ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरु केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम, वैशाली हॉटेल (Hotel Vaishali) सुरु केले. सुरुवातीला वैशाली हे छोटेखानी रेस्टॉरंट होते. कठोर मेहनतीने त्यांनी ‘वैशाली’चे नाव घराघरात पोहचविले. तरुण आणि वृद्ध दोघांसाठी ही लोकप्रिय ठिकाणे बनली आहेत. सेलिब्रिटी या रेस्टॉरंट्सना वारंवार भेट देतात.

हॉटेल वैशाली ला पुणे महापालिकेकडून (Pune Corporation) “क्लीनेस्ट किचन” पुरस्कार मिळाला आहे.
त्रिदल संस्थेने २००० साली पुण्यातील प्रतिष्ठित असा “पुण्यभूषण” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
चिमणलाल गोविंददास ममोरिअल ट्रस्टने त्यांना “उद्मम” गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
कोरोनाच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीला १ कोटी रुपयांचा निधी देऊन आपली दातृत्व दाखवून दिले होते.

 

 

Web Title :- Pune | Veteran hotelier and owner of Hotel Vaishali Jagannath Shetty passed away. He breathed his last at Prayag Hospital, Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jeevan Pramaan – Life Certificate | जर तुम्ही सुद्धा घेत असाल पेन्शन तर ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Monalisa | श्रीदेवीच्या गाण्यावर मोनालिसाचा जलवा, ‘हवा-हवाई’ या गाण्यावर नाचून चाहत्यांचं जिंकलं मन.

 

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमध्ये ‘धडाधड’ 10 गोळ्या झाडून सराईत गुन्हेगार योगेश जगतापचा ‘खात्मा’; पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Pravin Tarade- Sarsenapati Hambirrao | ‘सरसेनापती हंबीरराव’चा रक्त उसळवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्या भूमिकेत दिसणार प्रविण विठ्ठल तरडे (व्हिडीओ)

 

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार