Pune : सिनेमात काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं केला व्हिडीओ कॉल, 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेस व्हिडीओ कॉलकरून विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी राहूल श्रीवास्तव (रा. केरळ ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची एका व्यक्तीमार्फत राहूलची ओळख झाली होती. त्यावेळी राहूलने महिलेला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्क्रीन टेस्टसाठी त्याने महिलेला व्हिडीओ कॉल केला. फोनवर बोलत असताना राहूलने महिलेचे स्क्रीन शॉट काढून अश्लिल फोटो तयार केले. त्यानंतर संबंधित फोटो मॉडेलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुप वर व्हायरल केले. त्यानंतर त्याने महिलेला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत फोटो सोशल मिडीयावर टाकून बदनामी करण्याची भिती दाखविली. तर शिवीगाळ देखील केली. त्यानंतर महिलेने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.