पुण्यात युवकाला ‘विवस्त्र’ करून फिरवले, व्हिडिओ केला व्हायरल, चौकशीसाठी 8 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकी दुरुस्तीचे बिल कमी केल्यावरून गॅरेज चालकाचे एजंटनी अपहरणकरून विवस्त्र फिरवून व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला मारहाण करत सिगारेटचे चटकेही दिले आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अतिवरिष्ठ अधिकारयांनी कोंढवा पोलीस ठाणे गाठले असून या तरुणांकडे चौकशी सुरू केली आहे.
गॅरेज चालक आणि दुचाकी विक्री-खरेदी करणारे एजंट यांची ओळख आहे. त्यांनी काही दुचाकी या तरुणांकडे दुरुस्तीसाठी टाकली होत्या. त्याचे बिल कमी का केले यावरून मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी मात्र फोन बंद करून माहिती लपवित आहेत.

अपहरण केल्यानंतर या तरुणांनी त्याला विवस्त्र (नागड) फिरवून व्हिडिओ काढला. त्याला हाताने मारहण केली. तसेच व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुनाणे पोलिसांकडे धाव घेतली आहे. ही घटना सीसीटीव्हीत घटना कैद झाली असून, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Visit :  Policenama.com