Pune Voter News | पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार; मतदार संख्येत 74 हजार 470 ची वाढ

पुणे : Pune Voter News | भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (५ जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत ७४ हजार ४७० मतदारसंख्येची भर पडली आहे. (Pune Voter News)

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. (Pune Voter News)

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण ७४ हजार ४७० इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार
संख्या ३५ हजार ५९८ इतकी, महिला मतदार संख्या ३८ हजार ७२१ इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या १५१ ने
वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये २१ विधानसभा मतदार संघात एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० इतके मतदार
समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४१ लाख ६६ हजार २६५, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ८४
हजार ६६० व तृतीय पंथी मतददारांची संख्या ४९५ इतकी आहे.

अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे.
तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत
समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार
यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी
केले आहे.

मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर
ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं.६
भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.

Web Title :- Pune Voter News | 79 lakh 51 thousand 420 voters in Pune district; Increase in the number of voters by 74 thousand 470

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर