Pune Vyapari Mahasangh |  राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Vyapari Mahasangh |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराकडून 10 हजार दंड (10 thousand fine) वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला पुणे शहरातील विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने (Pune Vyapari Mahasangh) तिव्र विरोध केला आहे.

 

दुकान आणि विविध कार्यालयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (Fatehchand Ranka)
आणि सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitalia) यांनी दिली.
मास्क (Mask) न घातलेल्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंडाऐवजी 500 रुपये दंड आकारण्यात यावा.
अशी मागणी करण्यात आली आहे. (Pune Vyapari Mahasangh)

 

पुणे शहरात कोरोनाचा (Pune city Corona) प्रसार होऊ नये, यासाठी महासंघाने ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा मजकुराचे 20 हजार भित्तीपत्रके शहरातील विविध दुकानात लावली आहेत.
मास्क शिवाय दुकानात प्रवेश दिलाच जात नाही. यापुढेही दिला जाणार नाही. व्यापारी ग्राहकांची काळजी घेत आहेत.
एखाद्या ग्राहकाने वैद्यकीय कारण अथवा श्वासाच्या कारणामुळे मास्क खाली घेतला.
त्याचवेळी अधिकारी आले तर संबंधित ग्राहकाला 1 हजार आणि दुकानदाराला 10 हजार दंड आकारणार. हे चुकीचे आहे.
यामध्ये दुकानदाराचा काही दोष नाही, मग त्यांना दंड का, असा सवाल व्यापारी महासंघाने केला आहे.
तसेच लहान व्यावसायिक ही रक्कम कशी भरणार असा प्रश्न व्यापारी संघाने उपस्थित केला आहे.

 

Web Title : Pune Vyapari Mahasangh | Pune Vyapari Mahasangh opposes 10 thousand fine decision shopkeepers if customer does not wear mask

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ATM Rule Change | मोठी बातमी ! ATM मधून कॅश काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा अडकतील पैसे

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 536 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ