Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Wagholi Crime | पुण्यात वाघोलीजवळ असलेल्या बिवरी या गावात चाकूचा धाक दाखवत सात जणांनी घरावर दरोडा टाकला (Daroda). दरोडेखोरांनी दागिने व रोख रकमेसह 16 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि.1) मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) घटनास्थळी धाव घेतली. (Dacoity Case)

याबाबत प्रशांत विलास गोते (वय-40 रा. बिवरी पोस्ट नायगाव ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 7 अज्ञात दरोडेखोरांवर आयपीसी 395 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोते हे कुटुंबियांसमवेत घरात झोपले होते. सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अज्ञात 7 दरोडेखोरांनी घराचा मेन दरवाजा कटावणीने उघडून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील सर्वांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील बेडरुममधील कपाटातील पाच लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादी यांच्यासह बहिणीला, आईला मारहाण करुन जखमी केले. चोरट्यांनी गोते यांच्या घरातून 16 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Vijaykumar Magar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे (Kailas Kare PI), पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे (PI Seema Dhakane)
यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड