Pune Wakad Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून नराधमाकडून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wakad Crime | पाणी पिण्याच्या (Drinking Water) बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अनोळखी व्यक्तीने बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील वाकड (Pune Wakad Crime) परिसरात घडला आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पीडित तरुणीच्या आईने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीविरोधात IPC 376 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (Pocso Act) अधिनियम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रहाटणी परिसरात (Rahatani) फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात घडला आहे.( Pune Wakad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी घरात एकटी असताना, आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला.
आरोपीने पीडित तरुणीला जबरदस्तीने मिठी मारुन तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
तसेच तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे (PSI Gode) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Wakad Crime | A 17 year old girl was raped by a man who enter into a house under the pretext of drinking water Incidents in the Wakad area of ​​Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा