पुण्याची वाटचाल ‘गॅस चेंबर’च्या दिशेने

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

वाढती लोकसंख्या, बांधकामे आणि खाजगी वाहनांची वाढलेली संख्या, यामुळे निर्माण होणारा धूर आणि धुलीकणांमुळे हवेतील प्रदूषण वाढत आहे. मागील दहा वर्षात शहरातील अधिकाअधिक परिसर बांधकामाखाली आल्याने हिरवाई कमी झाली आहे. अशातच असलेल्या पीएमपीच्या तोट्यात वाढ होत असताना एस.टी. आणि रेल्वेचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत असल्याने सार्वजनिक वाहतुकही धोक्यात आली आहे. यामुळेे येत्या काही वर्षात आरोग्यदायी आणि पेन्शनरांचे शहर म्हणून असलेली पुणे शहराची ख्याती नामशेष होईल, अशी भिती पुणे महापालिकेच्या २०१७-१८ यावर्षीच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे महापालिका प्रशासनाने आज पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सर्वसाधारण सभेला सादर केला. मागील २१ वर्षांपासून पुणे महापालिका पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करत आहे. त्यामध्ये शहरातील हवा,ध्वनी, पाणी प्रदुषण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वृक्षराजी, शहराचा आर्थीक आणि भौगोलिक विकास आणि महापालिकेच्यावतीने करण्यात येणार्‍या आणि भविष्यात नियोजीत असलेल्या योजनांचा उहापोह केला जातो. त्यामधून विविध विभागांच्या वतीने केल्या नोंदीचा आधार घेतला जातो. प्रशासनाने यंदा प्रथमच पुणे शहराची २००३, २००८,२०१३ आणि २०१८ मधील सॅटेलाईट छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. यातून मागील किमान पंधरा वर्षात नागरिकरणामुळे वाढलेल्या बांधकाम क्षेत्राचा कसा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला तसेच हिरवाई कशी कमी झाली, हे साध्या नजरेनेही लक्षात येते.
[amazon_link asins=’B01M1GSOSS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d1bdad7-90a0-11e8-96cf-613efc724ed5′]

नागरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीची जोड नसल्याने खाजगी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. मार्च २०१६ मध्ये पुणे आरटीओकडे ३१ लाख ७ हजार ९६२ वाहनांची नोंदणी झाली होती. ती मार्च २०१८ मध्ये ३६ लाख २७ हजार २८० पर्यंत पोचली आहे. पुण्याची लोकसंख्या ३४ लाख आहे. आयटी हबमुळे उद्योग वाढल्याने विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. २०१६-१७ मध्ये ६५ लाख १२ हजार पाच जणांनी लोहगाव विमानतळावरून प्रवास केला होता. ती संख्या २०१७-१८ मध्ये ७१ लाख ९९ हजार ८५५ वर पोचली आहे. त्यातुलनेत रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या घटली आहे. २०१६-१७ मध्ये ७ कोटी ९५ लाख ३६ हजार प्रवाशांनी रेल्वेचा वापर केला. तर २०१७- १८ मध्ये ती संख्या सुमारे १८ लाखांनी कमी होउन ७ कोटी ७७ लाख २३ हजारांपर्यंत खाली आहे. खाजगी वाहनांच्या वापरामुळे एस.टी. प्रवांशांची संख्याही दरवर्षी घटत आहे. २०१६-१७ मध्ये ११ कोटी ८ लाख प्रवाशांवरून १० कोटी ६८ लाखांपर्यंत ती खाली आहे.

वाढत्या वाहनांमुळे इंधन आणि विजेचा वापर धोकादायक पद्धतीने वाढल्याने हवेतील प्रदूषण वाढले आहे. पर्यावरण प्रयोगशाळेने नोंदविलेल्या आकडेवारीतून शहराच्या मध्यवर्ती मंडई परिसरापेक्षा हडपसर परिसरातील प्रदुषणाची पातळी धोकादायकरित्या वाढत आहे. या परिसरातच मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे होत असून कचरा प्रक्रिया प्रकल्पांची संख्या अधिक असल्याने धूलीकण कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या विविध गॅसेसमुळे प्रदूषणात धोकादायकरित्या भर पडत आहे. वाहनांची संख्या, मोठी यंत्र, एक्झॉस्ट ङ्गॅनमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून यामध्ये कुत्र्यांच्या भुंकण्याच्याही भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
[amazon_link asins=’B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’994b8352-90a0-11e8-903a-059d7c9597c5′]

पुण्यात रहिवासी क्षेत्रात वीजेची सर्वाधीक मागणी

पुणे शहरात वीज ग्राहकांची संख्या १४ लाख १९ हजारांपर्यंत पोचली आहे. यामध्ये सर्वाधीक मागणी रहिवासी क्षेत्राकडून असून त्या खालोखाल व्यावसायीक, औद्योगीक, महापालिका आणि शेतीसाठीच्या किरकोळ मागणीचा क्रमांक लागतो. वीजेची बचत शाश्‍वत वीज वापरासाठी सौर उर्जेला प्राधान्य देण्यासाठी महापालिकेने विविध योजना आणल्या आहेत. परंतू यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी बसेसची संख्या वाढविण्यासोबत मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले आहे. यासोबतच सायकल शेअरींगच्या माध्यमातून शहरात पुन्हा सायकलींचा वापर वाढविण्यासाठी स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिका प्रयत्न करत आहे. विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिव्यांचा अधिकाअधिक वापर तसेच सौर उर्जेला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचर्‍याचे प्रदुषण रोखण्यासाठी घरोघरी जावून कचरा गोळा करण्यापासून बायोगॅस प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढविण्यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.