कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल बंधूंना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 8 जणांसह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि इतरांविरूध्द भादंवि 304,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत देखील जाहिर केली आहे. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी विवेक सुनिल अगरवाल (21) आणि विपुल सुनिल अगरवाल (21) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर सुरेश काळे यांनी फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी अ‍ॅल्कॉन लँडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागिदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (64), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (34), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (27), विवेक सुनिल अगरवाल (21), विपुल सुनिल अगरवाल (21), कांचन रजिस्टर संस्थेचे भागिदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी विवेक सुनिल अगरवाल (21) आणि विपुल सुनिल अगरवाल (21) यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्घटनेमध्ये 15 मजूरांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व बिहार राज्यातील कटिहार येथील लालमपूर तालुक्यातील आहेत. या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा