Pune Wall Collapse : कोंढवा दुर्घटनेतील आरोपीचे ससूनमधून पलायन, पण….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या आरोपीची लॉकअपमध्ये प्रकृती बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने स्वच्छता गृहातून पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याचा प्रकार आज (शनिवारी) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. मात्र, त्याचा पळून जाण्याचा डाव फसला आणि पोलिसांनी त्याला काही तासात पुन्हा अटक केली. राजाराम मारुती काळे (वय 32) असे आरोपीचे नाव आहे.

कोंढवा दुर्घटनेप्रकरणी आऱोपी असलेल्या राजाराम काळे याला शुक्रवारी (दि.२५) अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ ऑगस्ट पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला हडपसर लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याची तब्बेत बिघडल्याने दोन पोलीस कर्मचारी काळे याला ससून रुग्णालायत उपचारासाठी घेऊन गेले होते.

उपचारादरम्यान त्याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेत आरोपी काळे याला लोणी काळभोर येथील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उप निरीक्षक पाचपुते, पोलीस नाईक पृथ्वीराज पुंडुळे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी रघुनाथ जाधव, सोनवणे, चिवले यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –