Pune Wanwadi Crime | पुणे : पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण, चार महिलांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wanwadi Police Station | पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चार महिलांनी घरात घुसून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना हडपसर भागातील मंहमदवाडी रोड परिसरात 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चार महिलांवर आयपीसी 324, 452, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime News)

आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या परिचयाच्या असून एकाच परिसरात राहतात. आरोपी महिलेच्या पतीचे आणि फिर्यादी यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून याचा जाब मागितला. त्यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत हाताचा चावा घेऊन जखमी केला. तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Wanwadi Crime)

जुन्या भांडणाच्या रागातून रॉडने मारहाण

वानवडी : जुन्या भांडणाच्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना वानवडी परिसरात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कचरा डेपो समोरील रोडवर घडली आहे. याप्रकरणी उपेंद्रप्रसाद तुलसी प्रसाद यादव (वय-48 रा. इंडस्ट्रीयल एरिया, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिपक नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Wanwadi Crime)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Pulse Polio Vaccination | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पूर्वीचा डोस अवश्य द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

Maratha Protesters In Solapur | संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले