Pune Warje Malwadi Crime | भांडण सोडवल्याच्या रागातून दोन टोळ्यांमध्ये राडा, वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या वारजे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Malwadi Crime | भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांनी एकमेकांना धारदार हत्याराने, बांबू व विटांनी मारहाण करुन त्याठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. हा प्रकार 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील अचानक चौक व शिवाजी चौकात घडला होता. वारजे माळवाडी पोलिसांनी परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. (Pune Warje Malwadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी झालेल्या भांडणाच राग मनात धरून दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती. यात रामनगर शिवाजी चौकातील टोळीचा आकाश रविंद्र दिवेकर (वय-28) हा जखमी झाला होता. याचा बदला घेण्यासाठी शिवाजी चौकातील टोळीने रामनगर अचानक चौकातील टोळीचा सागर दिलीप कांबळे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. दोन्ही टोळी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अचानक चौकातील टोळीचे अमरजित मुन्ना सिंग (वय-23), रोहन अनिल चव्हाण (वय-35 दोघे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना चार तासात अटक केली. तर शिवाजी चौकातील टोळीमधील धनंजय उर्फ धनाजी नागनाथ सुर्यवंशी (वय-29 रा. गणेशपुरी सोसायटी, रामनगर), हेमंत उर्फ विकी धर्मा काळे (वय-26), युवराज धर्मा काळे (वय-24), आकाश उर्फ अवधूत महेश यादव (वय-29), कुंदन उर्फ सोन्या शिवाजी गायकवाड (वय-26), संजय उर्फ बाबू विकास चव्हाण (वय-20 सर्व रा. शिवाजी चौक, रामनगर) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे व पोलीस उपनिरीक्षक अनिता दुगांवकर करीत आहेत.

दहा जणांच्या टोळक्याने तिघांना कोयत्याने व रॉडने मारहाण करुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची
घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) रात्री साडेबाराच्या सुमारास रामनगर येथील अचानक चौकातील
पार्किंगमध्ये घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3
संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे,
सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार,
भुजंग इंगळे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, अजय कामठे, सत्यजित लोंढे, गणेश कर्चे,
किशोर नेवसे, योगेश वाघ यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Accident | पिंपरी चिंचवडमध्ये तीन अपघातांच्या घटना; तीन ठार

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू