Pune Warje Malwadi Crime | भांडण सोडवल्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण, वारजे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Malwadi Crime | भांडण सोडवल्याचा राग मनात धरून दहा जणांच्या टोळक्याने तिघांना कोयत्याने व रॉडने मारहाण करुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) रात्री साडेबाराच्या सुमारास रामनगर येथील अचानक चौकातील पार्किंगमध्ये घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सागर दिलीप कांबळे (वय-32 रा. अचानक चौक, रामनगर) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धनंजय सुर्यवंशी, विकी काळे, अक्षय यादव, कुंदन गायकवाड, बाबु चव्हाण, मोन्या मोरे, व्यंकटेश चव्हाण, अरबाज शेख, समृद्ध सांबरे, युवराज काळे (सर्व रा. रामनगर, वारजे) यांच्या विरोधात आयपीसी 307, 324, 323, 506, 143, 144, 147, 148, 149, 427, सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Warje Malwadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर कांबळे हे त्यांच्या घराजवळील अचानक चौकातील पार्किंगमध्ये मित्र
सुरज गायकवाड याच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले.
तू अरबाज शेख व निल नाईक यांची भांडणे का सोडवली असे म्हणत फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला.
तसेच मित्र सुरज याला मारहाण करुन जखमी केले. तसेच नितीन बुरडे याला देखील मारहाण करुन जखमी केले. आरोपींनी फिर्य़ादी यांच्या बाथरुमचा दरवाजा तोडून नुकसान केले. दरम्यान, परिसरातील लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. आरोपींनी हातातील कोयता व रॉड लोकांवर उगारुन दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील (API Sachin Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन