Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Malwadi Crime | डॉक्टर तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याचा प्रकार वारजे परिसरात घडला होता. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी राहत असलेल्या माई मंगेशर हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या हॉस्टेल परिसरात घडला होता. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य (Obscene Act) करुन विनयभंग (Molestation Case) करणाऱ्या तरुणाला वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) अटक केली आहे.

व्यंकटेश त्रिंबक फोपळे (वय- 19 रा. साई कॉलनी, आम्रपाली हॉटेल जवळ, वारजे मुळ रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 354, 354अ, 354ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉक्टर असलेल्या 26 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Warje Malwadi Crime)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय भरुक व अजय कामठे यांनी
तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी वारजे माळवाडी भागातील आम्रपाली हॉटेल जवळील लोढा हॉस्पिटलच्या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याचा शोध घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3
संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे,
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे,
संभाजी दराडे, विक्रम खिलारी, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Accident | पिंपरी चिंचवडमध्ये तीन अपघातांच्या घटना; तीन ठार

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू