Pune Warje Malwadi News | गाडीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून बेदम मारहाण, वारजे पोलिसांकडून चार जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Malwadi News | रस्त्याच्या मधून दुचाकी चालवणाऱ्यांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरुन चार जणांनी चारचाकी गाडीचा पाठलाग करुन एकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील ओव्हेल नेस्ट सोसायटी जवळ घडला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) दोन जणांना अटक करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फातिमानगर येथे कामाला आहेत. बुधवारी रात्री ते कामावरुन चारचाकी गाडीतून घरी जात असताना आर.एम.डी. कॉलेज समोरील गार्डन सिटी चौकातून वारजेकडे वळण घेत होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आरोपी रस्त्याच्या मधून जात होते. त्यामुळे फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा घरापर्यंत पाठलाग केला. सोसायटीच्या गेट समोर दुचाकी आडवी लावून फिर्य़ादी यांची चारचाकी गाडी आडवले. त्यानंतर हाताने व विटांनी मारहाण केली. यात फिर्य़ादी यांची बरगडी फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

वारजे माळववाडी पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना
पोलीस अंमलदार अजय कामठे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकीस्वार वारजे येथील म्हाडा वसाहतीत राहणारे
असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने इरफान करीम शेख (वय-19), अजय विठ्ठल खरात
(वय-19 रा. म्हाडा वसाहत वारजे) यांना अटक केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोघ ओलेकर करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू