Pune Water Supply | पुणे शहराला वर्षभर पुरणाऱ्या पाण्याचा मुठा नदीत विसर्ग

पुणे : Pune Water Supply | पुणे शहराला एक वर्ष पिण्यासाठी पुरेल ए‌वढ्या पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात (Mutha River) पावसाळा सुरू झाल्यानंतर करण्यात आला आहे. पुण्याला दरमहिन्याला 1.25 ते 1.50 टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यानुसार महानगरपालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) वर्षभरात 16 ते 17 टीएमसी पाणी घेण्यात येते. त्यामुळे शहराला वर्षभर पुरणारे 16 टीएमसी पाणी आतापर्यंत मुठा नदीत सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. (Pune Water Supply)

खडकवासला धरणसाखळी (Khadakwasla Dam) प्रकल्पातील टेमघर (Temghar Dam), वरसगाव
(Varasgaon Dam), पानशेत (Panseth Dam) आणि खडकवासला या चारही धरणांत दमदार पाऊस सुरू आहे.
त्यामुळे खडकवासला धरणातून मंगळवारी सायंकाळपर्यंत ६८४८ क्युसेक वेगाने नदीत पाणी सोडण्यात आले.
या चारही धरणांत मिळून एकूण २९.१० टीएमसी (९९.८३ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणात ४० मिलिमीटर, वरसगाव
धरणक्षेत्रात २० मि.मी., पानशेत धरण परिसरात १८ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात एक मि.मी. पावसाची
नोंद करण्यात आली. खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२९ क्युसेकने मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात येत
होते. पावसाचे प्रमाण वाढल्याने सकाळी ११ नंतर हा विसर्ग ३४२४ क्युसेकने वाढविण्यात आला.
वरसगाव धरणातून १४५८ क्युसेकने, तर पानशेत धरणातूनही ९७७ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी एक वाजल्यानंतर ४२८० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला.
दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात २६ मि.मी. आणि २७
मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात आठ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा विसर्ग
५१३६ क्युसेक, तर सहा वाजल्यानंतर ६८४८ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. (Pune Water Supply)

दरम्यान, पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, भामा आसखेड, आंद्रा, खडकवासला, नाझरे, वीर आणि उजनी अशी १३ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title :- Pune Water Supply | A handful of water that supplies the city of Pune for a year was released into the river

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली

Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही