Pune Water Supply | खडकवासला प्रकल्पात एका दिवसात दीड TMC पाणीसाठ्यात वाढ; शहरातील पाणीकपात रद्द होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस (Pune Rains) होत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पातील चार धरणात गेल्या तीन दिवसात तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून शनिवारी एका दिवसात दीड टीएमसी पाणी साठा वाढला आहे. चार धरणातील पाणीसाठा ७.७४ टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.६६ टीएमसी इतका होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे.

 

खडकवासला धरणात गेल्या २४ तासात ३२ मिमी, पानशेत (Panshet) – १२६ मिमी, वरसगाव (Varasgaon) – १२६ मिमी आणि टेमघर (Temghar) येथे १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चार धरणात मिळून एकूण २६.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो २९.७१ टक्के इतका होता.

 

पुणे जिल्ह्यात सर्वत्र सध्या चांगला पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात पिंपळगाव जोगे धरण (Pimpalgaon Joge Dam)
परिसरात सर्वाधिक १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर टेमघर १६५, कळमोडी (Kalamodi) १३७, पानशेत,
वरसगाव प्रत्येकी १२६, मुळशी (Mulshi) १०९, माणिकडोह (Manikdoh) ८८, येडगाव (Yedgaon) ८३, वडज (Vadaj) ३२,
डिंभे (Dimbhe) ४८, घोड (Ghod) १५, चिल्हेवाडी (Chilhewadi) ८४, विसापूर (Visapur) ५, चासकमान (Chaskaman) ७३,
भामा आसखेड (Bhama Askhed) ४५, वडिवळे (Vadiwale) ११०, पवना (Pavana) १०५, आंद्रा (Andhra) ८५,
कासारसाई (Kasarasai) ३८, गुंजवणी (Gunjawani) ११५, निरा देवधर (Nira Deodhar) १०५, भाटघर (Bhatghar) ६१,
वीर (Veer) ७, नाझरे (Nazare) ६, उजनी (Ujani) ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune Water Supply)

पुणे जिल्ह्यात लवासा (Lavasa) येथे १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भोर (Bhor) १०७, गिरीवन (Girivan) ८८,
लोणावळा (Lonavla) ७२, तलेगाव (Talegaon) ५४, लवळे (Lovely) ३५, राजगुरुनगर (Rajgurunagar) ३२,
वडगावशेरी (Wadgaon Sheri) २६, पाषाण (Pashan) २४, शिरूर (Shirur) २३, आंबेगाव (Ambegaon) १९,
हडपसर (Hadapsar) १८, शिवाजीनगर (Shivajinagar) १८, मगरपट्टा (Magarpatta) १७, कोरेगाव पार्क (Koregaon Park) १६,
दौंड (Daund) १६, ढमढेरे (Dhamdhere) १५, इंदापूर (Indapur) १४, बारामती (Baramati) ११, पुरंदर (Purandar) ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Pune Water Supply | An increase of one and a half TMC of water per day in Khadakwasla project The city will run out of water

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा