Pune Water Supply | समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे निर्देश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पाणी वापर नियंत्रित (Pune Water Supply) करण्यासाठी मनपाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. समान पाणीपुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची (Pune Water Supply) अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, राहूल कुल, सुनील टिंगरे, मनपा आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.

 

पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा (Pune Water Supply) आपण स्वतः दर महिन्याला महानगरपालिकेकडून आढावा घेणार असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर 2023 पर्यंत, तर पाइपलाइनचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढवून 33 टक्क्यांपर्यंत होईल, सर्वांना समान पाणी मिळेल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पाणीगळती थांबवण्यासाठी जुन्या पाइपलाइन बदलण्यात याव्यात.
आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत.
सोसायट्यांमधील पाणीगळतीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत. बांधकामाला,
बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. यावेळी मंजूर पाण्याचा कोटा,
मागील वर्षातील पाण्याचा स्रोतनिहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्रनिहाय झोन,
समान पाणीपुरवठा प्रकल्प, टाक्या प्रकल्प, पाइपलाइन कामाची प्रगती व नियोजन,
मीटर्स बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन याबाबतचा आढावा घेण्यात आला.

 

शहरातील सोसायट्यांमध्ये होत असलेल्या पाणीगळतीवर लक्ष देण्याची गरज असून,
जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत मनपा अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारणा केली,
तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाण्याचा व्यापार होणार नाही,
याकडे लक्ष देत पाणीगळतीची अन्य कारणेही शोधावीत, असे सांगितले.

 

Web Title :- Pune Water Supply | Complete the works of the same water supply scheme within the stipulated time Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..