Pune Water Supply | पुण्यात सलग 4 दिवसात कमी दाबाने पाणीपुरवठा, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पर्वती जलकेंद्राच्या (Parvati Jal Kendra) अखत्यारितील LLR टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईनचे मेंटेनन्सच्या कामामुळे आजपासून म्हणजेच शनिवार दि. 12 फेबु्रवारी 2022 पासून ते मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत पुण्यात सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी केले आहे. (Pune Water Supply)

 

पाणी पुरवठा बाधित होणार भाग –

पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा All Peth Areas (शनिवार दि. 12 फेब्रुवारी 2022 पासून ते मंगळवार दि. 15 फेब्रुवारी), दत्तवाडी (Dattawadi) परिसर, राजेंद्र नगर (Rajendra Nagar), लोकमान्य नगर (Lokmanya Nagar), डेक्कन परिसर (Deccan GymKhana), शिवाजीनगर परिसर (Shivaji Nagar), स्वारगेट (Swargate), पर्वती दर्शन (Parvati Darshan), मुकुंद नगर (Mukund Nagar), भवानी पेठ (Bhavani Peth) व नाना पेठ (Nana Peth) येथील भागांना 4 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Water Supply | low pressure water supply for four days in this areas of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा