Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

5 वर्षे सत्तेतील स्वपक्ष भाजपला बापट यांचा घरचा आहेर ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेत प्रशासक (PMC Administrator) येवुन जेमतेम १२ दिवस होत नाहीत तोवर महापालिकेत (Pune Corporation) पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचेच (BJP) खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांनी शहरात ‘समान पाणी पुरवठा’ (Pune Water Supply) होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीतून (Kalwa Samiti Meeting Pune) सभात्याग केला. एवढेच नव्हे तर पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी (Pune Water Supply) आंदोलनही छेडण्यात (Protest) येईल असा इशारा देत एकप्रकारे घरचा आहेर दिला. (PMC 24×7 Water Supply Project)

 

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज विधानभवन येथे कालवा समितीची बैठक होती.
या बैठकीला उपस्थित असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का ? संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली.
यावर स्पष्टीकरण देताना उपाययोजना करू असे आश्वासन संबंधीत अधिकार्‍यांनी दिले.
मात्र, या उत्तराने समाधान न झाल्याने बापट यांनी फक्त आश्वासन देऊन काम चालणार नाही.
पुण्याला समान पाणीपुरवठा झालाच पाहिजे या करता आंदोलन करावे लागेल, असा इशारा देत तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला. (Pune Water Supply)

दरम्यान, मागील पाच वर्षात महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे.
या सत्ताकाळात राज्यातही तीन वर्षे भाजपचीच सत्ता होती.
शहरात समान पाणी पुरवठ्यासाठीची योजना २०१६ मध्ये हाती घेण्यात आली आहे.
मार्च २०२२ मध्ये या योजनेेचे काम पूर्ण होणार होते. परंतू मागील पाच वर्षात या योजनेेचे टेंडर एक हजार कोटी रुपयांनी फुगवून आले होते.
तसेच योजनेतील एका कंपनीने सुमारे वर्षभर त्यांचे काम बंद ठेवले होते.
फेरनिविदा, संबधित कंपनीने लवादाकडे मागितलेली दाद,
तसेच अनेक ठिकाणी नगरसेवकांकडून ठेकेदारांची करण्यात आलेली अडचण आणि कोरोनामुळे काही महिने बंद ठेवावे लागलेले काम यामुळे ही योजना जेमतेम ५५ टक्केच पुर्ण झाली आहे.

समाविष्ट ३४ गावांमध्येही बांधकाम परवानग्या देताना मागील सरकारने स्थापन केलेल्या पीएमआरडीएने पाणी पुरवठ्याची जबाबदारी घेण्याच्या हमीवरच विकसकांना परवानगी दिली आहे.
परंतू आता त्या समाविष्ट गावांमधील नव्याने विकसित झालेल्या सोसायट्यांमधील नागरिकांना विकतचे पाणी टँकरने घ्यावे लागत आहे.
विशेष असे की मागील सरकारमध्ये विद्यमान खासदार गिरीष बापट हेच पालकमंत्री होते.
पालकमंत्री या नात्याने त्यांचे ‘पीएमआरडीए’च्या (PMRDA) कारभारावर विशेष ‘लक्ष्य’ होते.
आता त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Corporator Amol Balwadkar) यांनी समाविष्ट गावात महापालिकेने अथवा पीएमआरडीएने पाणी पुरवठा करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तर चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम झाल्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) हे उपोषणासाठी बसले आहेत.

 

प्रशासक नेमल्यानंतर अवघ्या दहा – बारा दिवसांत पुण्यातील पाणी प्रश्‍नाबाबत भाजपच्याच लोकप्रतिनिधींनी ही पावले उचलल्याने मागील पाच वर्षात शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

 

Web Title :- Pune Water Supply | not getting equal water supply in Pune city Girish Bapat leave Kalwa Samiti meeting today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा