Pune Water Supply | पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये कमी पाणीसाठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Water Supply | यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये (Pune Dams) कमी पाणीसाठा आहे (Pune Rainfall). पुणे महापालिका सध्या ठरलेल्या प्रमाणापेक्षा धरणातून जास्त पाणी उचलत असल्याने जलसंपदा विभागाने याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबत लेखी उत्तर मागितले होते. त्यावर महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC), लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करू, असे जलसंपदा विभागाला कळविले आहे. दरम्यान, ही पाणीकपात नव्या वर्षापासून सुरू होऊ शकते. (Pune Water Supply)

मान्सून संपल्यानंतर धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेसाठी केवळ १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने बैठकीत घेतला आहे (Pune Water Cut). परंतु, महापालिका नेहमीप्रमाणे प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणांमधून घेत आहे. हे प्रमाण कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार नसल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेस पत्राद्वारे कळविले होते. (Pune Water Supply)

त्यावर महापालिकेने पाणी जपून वापरण्याची ग्वाही दिली. मात्र, जलसंपदा विभागाने तोंडी मोघम न सांगता ठोस उपाययोजना काय करणार? याबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यावर महापालिकेने जलसंपदा विभागाला १६ टीएमसीपैकी दोन टीएमसी पाण्याची बचत करू. ही बचत दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात करू, जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत, त्यामुळे पाणी गळती कमी होईल, असे लेखी कळविले आहे.

महापालिकेने जलसंपदा विभागाला दिलेल्या माहितीनुसार शहरात लवकरच दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशावरुन जमीन नावावर करण्यासाठी लाचेची मागणी, रक्कम स्वीकारताना तलाठी व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक