Pune Water Supply | पाणी गढूळ येतंय, पाईपलाईन फुटली तर ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा, पुणे महापालिकेकडून स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठ्यासंदर्भात (Pune Water Supply) अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडवण्यसाठी पुणे महानगरपालिकेने 24 X 7 एक स्वतंत्र हेल्पलाईन (Helpline) सुरु केली आहे. यासाठी 020- 25501383 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. पुणेकरांनी पाणीपुरवठ्याबाबत (Pune Water Supply) तक्रार असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले.

उन्हाळ्यात पुणे शहरात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणं, गढूळ पाणि येणं,
पाईपलाईन फुटणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागकडे येत असतात. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नगारिकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन व्हावे यासाठी पालिकेने हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना पाणीपुरवठ्यासंदर्भात (Pune Water Supply) तक्रार करण्यासाठी 24 X 7 हेल्पलाईन सुरु
करण्यात आली असून 1 मार्च 2023 पासून 24 तास तक्रार प्रणाली चालू केली जाणार आहे.
नागरिकांनी तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Web Title :- Pune Water Supply | The water is getting muddy, if the pipeline bursts, contact this number, a separate helpline number from Pune Municipal Corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला