Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामामुळे ‘फुटली’ होती जलवाहीनी ! डेक्कन, प्रभात रस्त्यावरील कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याचा उलगडा झाला

पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील (Karve Road) दुहेरी उड्डाणपुलाचे काम करताना खोदाईच्यावेळी फुटलेल्या पाईपलाईनमुळे डेक्कन परिसर (Deccan Gymkhana) व प्रभात रस्ता (Prabhat Road, Pune) परिसरात मागील अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) काल रात्री उशिरापर्यंत ही पाईपलाईन दुरूस्त केल्याने पाणी पुरवठा पुर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Pune Water Supply)

 

डेक्कन व प्रभात रस्ता परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या परिसरात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचेही (PMC 24×7 Water Supply Project) काम सुरू असल्याने नवीन लाईन्स टाकूनही कमीच दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेचे अधिकारीही हैराण होते. दरम्यान, मागील आठवड्यात शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरू केले आहे. तर खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी तर कालवा समितीच्या बैठकीतून विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून सभात्याग करत आंदोलनाचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर काल महापालिका आयुक्तांच्या (PMC Commissioner Vikram Kumar) मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी देखिल धडक देत बंगल्यात तरी पुरेशा दाबाने पाणी येतेय का ? याची पाहाणी केली. (Pune Water Supply)

 

दरम्यान, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या परिसराला ज्या एसएनडीटी जलकेंद्रातून (SNDT Water Station) पाणी पुरवठा होतो, तेथपासून तपासणी सुरू केली होती. त्यावेळी एसएनडीटी कडून कर्वे रस्त्याने येउन प्रभात रस्त्याकडे जाणार्‍या वाहीनीतून मोठ्याप्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. नळ स्टॉप चौकातील मेट्रोसाठीच्या दुहेरी उड्डणपुलाजवळील पावसाळी गटारातून मोठ्याप्रमाणावर पाणी वाहत असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. महामेट्रोच्या वतीने हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाचे काम करताना एक वाहीनी फुटल्याने ही गळती झाल्याचे समोर आल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्री दोन वाजता दुरूस्तीचे काम पुर्ण झाले, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Superintendent Engineer Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले.

कर्वे रस्त्यावर कलमाडी हाउसजवळील (Kalmadi House) वॉल्वची देखिल दुरूस्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ६ मध्येही वाहीनीमध्ये कापड अडकल्याने पाण्याचा दाब कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथेही दुरूस्ती करण्यात आली आहे.
यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे, असे पावसकर यांनी नमूद केले.

 

पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू (Launch of Helpline for water supply complaints)

उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे वाहीन्या नादुरूस्त होउन पाणी पुरवठा खंडीत होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
या पार्श्‍वभूमीवर पाणी पुरवठा विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे.
महापालिका भवन (Pune Mahapalika Bhavan) येथे यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला असून तक्रारीसाठी दू. क्र. २५५०१३८३ उपलब्ध करून दिला आहे.
ही हेल्पलाईन सुट्टी व्यतिरिक्त सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.
याठिकाणी तीन कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबधित झोनच्या पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचार्‍यांकडून शक्य तितक्या लवकरच त्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही अनिरुद्ध पावसकर यांनी नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Water Supply | The waterway was burst due to the work of double flyover on Karve Road The low pressure water supply on Deccan Prabhat Road was revealed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा