Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागांत सोमवारी पाणी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरातील विविध भागात फ्लो मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोमवारी (दि.20) चांदणी चौक टाकीच्या (Chandni Chowk Tank) मागे वारजे WTP वरुन चांदणी चौक टाकीला येणाऱ्या एक हजार मीमीची रायझिंग मेन लाईन लिकेज झाले आहे. त्या लाईनच्या दुरुस्तीचे काम सोमवारी केले जाणार आहे. त्यामुळे वारजे WTP वरुन चांदणी चौक टाकीचा पणीपुरवठा (Pune Water Supply) सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

 

तर मंगळवारी (दि.21) कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर- पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सँटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी (चढावरील भाग), चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.

 

9 MLD Raw Water Outlet वारजे WTP- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर

10 MLD Raw Water Outlet वारजे WTP- कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे

 

Web Title :- Pune Water Supply | Water shut off in ‘these’ areas of Pune city on Monday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा