×
Homeताज्या बातम्याPune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरतील वारजे जलकेंद्र व अख्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. H.L.R टाकी परिसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग, कोंढवे-धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत, पंपींग व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिके कडून देखील देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने वरील पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचा गुरुवारी (दि.1) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.2) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर

पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी आणि चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, संपूर्ण पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता.

गांधी भवन टाकी परिसर

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बीएसयूपी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीबन, गांधीभवन, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रायमारोज, ऑर्किड लेन 7, 9, मुंबई-पुणे बायपास रोडच्या दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर

GSR टाकी परिसर

कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली नं 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1 ते 10

एस.एन.डी.टी (H.L.R. व M.L.R)

गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरुड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी,
श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर,
रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी,
वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनकवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी,
भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा,
SNDT परिसर, कर्वे रोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनकवाडी, वैदुवाडी, वडारवाडी,
पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.

कोंढवे-धावडे जलकेंद्र

वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे.

नवी व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग

मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Web Title :- Pune Water Supply | Water supply to half of Pune city will be shut down on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं

Chhagan Bhujbal | “सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकलेत” -छगन भुजबळ

Must Read
Related News