Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) लष्कर जलकेंद्र (lashkar water station) व वडगाव जलकेंद्र (Vadgaon water station) अखत्यारीतील रामटेकडी टाकीवरील विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.09) रोजी पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

तसेच शुक्रवारी (दि.10) शहरात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कळवले आहे.

 

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

वडगाव जलकेंद्र परिसर – सिंहगड रोड वरील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

रामटेकडी टाकीवरील परिसर – हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी.टी. कवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to some parts of Pune city will be cut off on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा