Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) होळकर (Holkar) व वडगाव जलकेंद्र (Wadgaon water station) येथे विद्युत विषयक (Electrical) देखभाल दुरुस्तीची कामे करावयाचे असल्यामुळे, येत्या गुरुवारी (दि.10) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तर शुक्रवारी (दि.11) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

या कामामुळे गुरुवारी (दि.10) होळकर व वडगाव जलकेंद्र येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे वडगाव जलकेंद्र,नवीन होळकर जलकेंद्र तसेच जुने होळकर परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

नवी होळकर जलकेंद्र – मुळा रोड, संपूर्ण खडकी परिसर, अम्युनेशन फॅक्टरी, हरीगंगा टाकीवरील संपूर्ण परिसर, हरीगंगा सोसायटी, राम सोसायटी, फुले नगर, इंदिरा नगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, आंबेडकर नगर, पोरवाल पार्क, पंचशील नगर, प्रतिक नगर, मोहनवाडी, कस्तुरबा सोसायटी, श्रमिक वसाहत, जाधव नगर, मेंटल हॉस्पिटल वसाहत, मोक्षे नगर, राजकपूर सोसायटी व माजी सैनिक नगर इत्यादी.

जुने होळकर जलकेंद्र – एच. ई. फॅक्टरी व एम. ई. एस.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of ​​Pune city will be cut off on Thursday

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा