Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर (Shivajinagar) येथील कामगार पुतळ्याजवळील पाण्याची मुख्य वितरण नलिका मेट्रोच्या कामामुळे स्थलांतरित करण्याचे काम गुरुवारी (दि.5) केले जाणार आहे. तसेच चांदणी चौक (Chandni Chowk) येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरुड परिसराला पाणीपुरवठा करणारी सोळा इंच जलवाहिनी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी कोथरूड आणि शिवाजीनगर भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहणार आहे.

तर शुक्रवारी (दि.6) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, सिव्हील कोर्ट, कपोते गल्ली, सिमला ऑफिस परिसर, मोदीबाग परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट इ.

कोथरुड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी-डावी भुसारी कॉलनी, वेद भवन रोड वरील भाग,
डुक्करखिंड, हिलव्हिव सोसायटी, बूड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चढावरचा भाग लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ.

Web Title :-Pune Water Supply | Water supply to this area of Pune will be closed on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘जे मिंधे, मांडलिक असतात, त्यांना…’; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Pune Crime News | मुंढव्यातील तारांकित हॉटेलच्या मॅनेजरची महिला सहकार्‍याकडे शरीरसंबंधाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

Maharashtra Politics | ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ’

CM Eknath Shinde | छत्रपती संभाजी महारांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाकडून अजित पवारांची पाठराखन; याबाबत मुख्यमंत्र्यांना सुनावत म्हणाले…

Sneha Ullal |अभिनेत्री स्नेहा उल्लालने ‘या’ कारणामुळे एका हॉलीवुड प्रोजेक्टला दिला नकार; म्हणाली “एवढी नग्नता …”