Pune Water Supply | पुण्यात गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply| भामा आसखेड प्रकल्पाच्या अख्यारीतील कुसमाडे वस्ती येथे नवीन टाकी मुख्य जलवाहिनीस जोडली जाणार आहे. त्यासाठी ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ठाकरसी टाकीच्या अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा गुरुवारी (दि.29) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तर शुक्रवारी (1 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.(Pune Water Supply)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

भामा आसखेड प्रकल्प ठाकरसी टाकी वरील परिसर

  • आदर्शनगर, कल्याणी नगर, हरी नगर, रामवाडी, शास्त्रीनगर

जागतिक जलवाहिनी वरील परिसर

  • संपूर्ण गणेशनगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल परिसर, विश्रांतवाडी स.नं. 112 अ,
    कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क, एयर पोर्ट, यमुना नगर,
    दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, श्री. पार्क, ठुबे पठारे नगर

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी