Pune Weather | पुण्यात थंडीचा कडाका वाढला ! हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Weather | उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अजूनही जाणवत असून पुण्यात या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद शनिवारी सकाळी झाली. पुण्यात शनिवारी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे आणि आसपास जमिनीलगतचे वारे पूर्व दिशेने वाहत असून ते उत्तरेकडून वळून राज्यावर येत आहे. हे वारे थंड व कोरडे असल्याचा त्याचा जास्त प्रभाव विदर्भ व उत्तर महाराष्ट्रावर असेल. त्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आज दिसून आले आहे. (Pune Weather)

 

राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ७.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील २४ तासात मध्य भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता असून त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ व छत्तीसगड भागात पुढील २४ तासात तीव्र थंड दिवस राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व छत्तीसगड भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. (Pune Weather)

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे शिवाजीनगर ८.६, पाषाण ८.२, चिखलठाणा ८, नाशिक ७.८, परभणी ९.७, सातारा १३.६, अहमदनगर ७.५, सोलापूर ११.४, उस्मानाबाद ११, नांदेड १०.६, मालेगाव ८.४, जालना १०.२, जेऊर १०, नागपूर ७.६, कुलाबा १९.५, सांताक्रूझ १७.८, कोल्हापूर १५.९, अकोला ९.१, अमरावती १०.२, बुलढाणा ९.२, चंद्रपूर ९.४, गडचिरोली ८.६, गोंदिया ७.४, वर्धा ८.८, वाशिम १३, यवतमाळ १०.५.

 

Web Title :- Pune Weather | Cold snap in Pune The lowest temperature recorded during the season

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा