Pune : कोंढव्यात नक्की काय होणार ! भाजी मंडई की E-लर्निंग स्कुल, कोण करतेय ‘दिशाभूल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ( बसित शेख )  मागील महापालिका निवडणुकीत एकत्र लढलेल्या नगरसेवकांनी आतापासूनच पुढील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या तीन -चार वर्षात आपण हे केले, ते केले हे सांगण्याची चुरस या नगरसेवकांमध्ये सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

त्यातून कोंढव्यात सध्या फ्लेक्सयुद्ध सुरु झाले आहे.

त्यात फ्लेक्सबाजी करण्यात अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी आघाडी घेतली आहे. चौका चौकात, रस्त्यामधील दुभाजकांवर त्यांचे फ्लेक्स दिसत आहेत. त्याचवेळी शितल पेट्रोलपंपामागील जागेवर एकावर एक उभ्या राहिलेल्या दोन फलकाने अवघ्या कोंढव्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर ही जागा एका बांधकाम व्यावसायिकांच्या अ‍ॅमेनिटी स्पेसची आहे. महापालिकेच्या ताब्यात ही जागा असून त्या ठिकाणी कोणते विकास कामे करायची याचा आराखडाही विकास आराखड्यात देण्यात आले असून त्यामध्ये भाजी मंडईचे आरक्षण टाकण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे भाजी मंडई होणार असा फलक लावण्यात आला आहे. त्याची संकल्पना नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि नगरसेविका हमिदा अनिस सुंडके यांची असल्याचे त्यावर म्हटले आहे.

kondhwa

दरम्यान, या फलकावरच एक बोर्ड लावला आहे. त्यावर ई -लर्निंग स्कुल असे लिहिण्यात आले असून संकल्पना अ‍ॅड. हाजी अ. गफूर अहमंद पठाण यांची असल्याचे म्हटले आहे. त्याच्याजवळच पठाण यांनी आणखी एक फ्लेक्स लावला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या प्रभाग क्र. २७ मधील मनपा शाळेत वर्ग खोल्याची कमतरता भासत असल्याने नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर आयुक्त गायकवाड यांनी लगेचच आपण मला जागा दाखवा व १ कोटींचे निधी देण्याचे आश्वासन दिले होते. नगरसेवक पठाण यांनी मागील ८ महिने स. न. ४०/१+४०/ ५ शितल पेट्रोल पंप मागील बिल्डरची अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा पाठपुरावा करुन मनपाने ताब्यात घेतली. त्यानुसार १३ फेब्रुवारी २० रोजी सदर जागेवरीत ई लर्निंग शाळेसाठी ठराव इस्टिमेट कमिटीला दिला आहे. आयुक्त गायकवाड यांनी प्रस्ताव मंजुर करुन सदर जागेवरती ई लर्निंग शाळा बनण्याची कार्यवाही सुरु केली आहे, नागरिकांनी नोंद घ्यावी, असा फ्लेक्स लावला आहे.

kondhwa

या दोन वेगवेगळ्या फलकामुळे कोंढव्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या जागेवर नेमके काय होणार, भाजी मंडई की ई लर्निंग स्कुल.

kondhwa

भाजी मंडईसाठी ही जागा आरक्षित असताना त्या जागेवर ई लर्निग स्कुल कसे करता येईल. ई लर्निंग स्कुल करण्यासाठी अगोदर भाजी मंडईचे आरक्षण उठवावे लागेल. महापालिकेने असा प्रस्ताव तयार केला तरी राज्य शासनाकडून त्याला मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी बराच कालावधी जातो. एकाच पक्षातील दोघा नगरसेवकांचा वेगळा सूर का सुरु झाला. तेथे ई लर्निंगसाठी मंजूरीपासून ते प्रत्यक्ष येण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. असे असताना भाजी मंडई ऐवजी ई लर्निंगचा आग्रह का धरला जात आहे ?. असा प्रश्न कोंढव्यातील नागरिकांना पडला आहे.

pune

मागील महापालिका निवडणुकीत एकत्र प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोंढव्यात हज हाऊस बांधणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्याला आता ४ वर्षे होत आली तरी हज हाऊसचे काम अर्धवट झाले आहे. ते कधी पूर्ण होणार. मागील निवडणुकीत एकत्र प्रचार केलेल्या हे तीनही नगरसेवक आता स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी करु लागले आहेत. रस्त्याच्या दुभाजकावर फ्लेक्स लावताना त्यासाठीचा वीजपुरवठा बेकायदेशीरपणे घेता असल्याचे दिसून येते. मात्र, त्याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना रामटेकडी वानवडी विभाग वर्डऑफिस चे , ना महावितरणचे ,का ? .दोघेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे अंसख्य प्रश्न कोंढव्यातील नागरिकांच्या मनात उभे राहिले आहेत. त्याला हे नगरसेवक उत्तर देतील का? का कोंढवाकरांची दिशाभुल करण्याचा हा प्रयत्न आहे.