Pune : चंद्रकांत गायकवाड यांना अद्याप बढती का दिली नाही? मंत्री बच्चू कडू यांनी कामगार आयुक्तालयाकडून अहवाल मागवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक अधिकारी चंद्रकांत गायकवाड यांना विशेष सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून बढती द्यावी, असे आदेश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. मात्र अद्याप त्यावर कामगार आयुक्तालयाकडून काहीही प्रगती झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी बढती का दिली नाही, याचा अहवाल मागविला आहे.

चंद्रकांत गायकवाड हे गेली अनेकवर्षे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत त्याच्या कामामुळे त्यांना सुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली होती. त्यांनी 12 वर्षं काम केले आहे. या कालावधीत त्यांनी ससून रुग्णालय तसेच इतर ठिकाणी देखील काम केले आहे. या कालावधीत त्यांच्या कामाची दखल खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली. तर त्यांना वेगवेगळे 12 पुरस्कार देखील मिळाले आहेत.

त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना विशेष अधिकारी म्हणून नेमणूक द्यावी, असे शिफारसपत्र व प्रस्ताव कामगार आयुक्तांना दिला आहे. गेल्या वर्षी हा प्रस्ताव दिला आहे. पण, त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबतचा आता अहवाल देकगील कामगार आयुक्तालयाकडून मागवला आहे, असे चंद्रकांत गायकवाड यांनी दिली आहे. राज्यमंत्री प्रस्ताव देऊनही हे प्रशासन त्यावर काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.