पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार असून, त्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करणार असल्याची माहिती भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

शहर भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार मिसाळ बोलत होत्या. प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, नवनियुक्त सरचिटणीस गणेश बिडकर, मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष, महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी लोकप्रतिनिधी आणि संघटनेची दुहेरी जबाबदारी टाकली आहे. पक्षातील सर्व सहकार्‍यांच्या मदतीने ती यशस्वीपणे पार पाडू असा विश्‍वास आमदार मिसाळ यांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत जागा वाटपाचा निर्णय मु‘यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही मिसाळ यांनी सांगितले.

श्री. गोगावले म्हणाले, ‘शहर अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांनी मला सहकार्य केले व प्रेम दिले. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे संघटनात्मक काम उभे करता आले. नेतृत्वाने टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न मी केला. माधुरीताई अधिक चांगल्या पद्धतीने संघटनेचे काम करतील असा विश्‍वास वाटतो.’

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like