Pune : महिला अकाउंटटने केला कंपनीत तब्बल 11 लाखांचा अपहार; शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील घटना

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सचिन धुमाळ ) –  शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील बजरंगवाडी मधील फोरटीस केबल प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या अकाउंटटनेच कंपनीतून तब्बल अकरा लाख चौदा हजार रुपयांचा अपहार(Embezzlement) केल्याची घटना ताजी असतानाच आता सणसवाडी येथील एका कंपनीतील महिला अकाउंटटने कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल अकरा लाख एक्कावन हजार रुपयांचा अपहार(Embezzlement) केल्याची घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिपा आत्माराम नाणेकर या महिला अकाउंटटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी ता. शिरुर येथील आलराटेक प्रो पेक सिस्टीम या कंपनीने अकाउंटट म्हणून दिपा आत्माराम नाणेकर ह्या महिलेला २०२० पासून नोकरीवर ठेवलेले होते. मात्र कंपनीच्या बँक खात्यातील रकमेत काही तफावत आढळत असल्याचे सदर कंपनी व्यवस्थापकाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कंपनीचे बँक खाते तपासले असता त्यांना कंपनीच्या अकाउंटट दिपा नाणेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांच्या जवळील इसमाच्या बँक खात्यात वेळोवेळी तब्बल अकरा लाख एक्कावन हजार चारशे चाळीस रुपये ट्रान्सफर केल्याचे तसेच बँकेचे आलेले ट्रान्जेशन मध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले, याबाबत रामदास सदाशिव कदम वय ३५ वर्षे रा. राळेगण सिद्धी पारनेर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आलराटेक प्रो पेक सिस्टीम या कंपनीच्या अकाउंटट दिपा आत्माराम नाणेकर वय ५५ वर्षे रा. पंचवटी पिंपरी चिंचवड यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

 

Lockdown किती दिवसांसाठी वाढणार ?; राजेश टोपे म्हणाले…

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या

पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

रक्ताची कमतरता असल्यास आहारात ‘या’ 12 सुपर फूड्सचा समावेश करा, जाणून घ्या

Pune : खडकवासला डावा कालवा रस्ता कोंढवे-धावडे, शिवणे ते कोंढवा गेट (एनडीए प्रवेशद्वार) पर्यंत वाढवण्याचा मार्ग अखेर मोकळा; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून रस्त्याला मंजूरी

कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या