पुणे : वारजे माळवाडी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रस्त्यालगत असलेल्या चेंबरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात नागरिकांना उग्र वास येत असल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरीष्ठ निरीक्षक अशोक कदम, गुन्हे शाखेचे अमृत मराठे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचे अंदाजे वय 30 ते 35 असून अंगावरती मेहंदी कलरचा ड्रेस असल्याचे समजले आहे. महिलेची अद्याप काही ओळख पटलेली नाही. महिलेचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वी चेंबरमध्ये टाकला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृतदेह फुगलेला व काही प्रमाणात सडलेल्या अवस्थेत असून महिलेचा हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदरील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत.

Visit : Policenama.com