Pune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आराम बसने दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा प्रकार पुणे-सोलापूर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी घडला आहे.

उजमा मोहसीन पठाण (वय ३६,रा. साईबाबानगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खासगी आरामबस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहसीन पठाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार पठाण दाम्पत्य दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी शेट्टी गॅरेजसमोर खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिली. पठाण दाम्पत्य रस्त्यात पडले. त्याचवेळी तेथून निघालेल्या डंपरच्या चाकाखाली उजमा सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या बसचालकाचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.