इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे – पोलिसनामा ऑनलाइन – इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसने दिलेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला. तर पती जखमी झाला आहे.

आशा नरहरी साळुंके (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नरहरी साळुंके (वय ५६, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी सकाळी साडेअकराच्या सुमारास आशा त्यांच्या पती नरहरी सोबत दुचाकीवरुन हडपसरला जात होत्या. त्यावेळी घोरपडी परिसरातील एम्प्रेस गार्डन रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या शालेय बसचालकाने नरहरी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने आशा गंभीररित्या जखमी झाल्या. चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल आशा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अ‍े. इ. शेटे अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like