Pune : भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. महिला एका खासगी कंपनीची व्यवस्थापिका होती.

रोहिणी संजय टिळेकर (वय ४८, रा. मांजरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विजय सायकर (वय २४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरचालकाने त्यांना धडक दिली. त्यात खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्यामुळे रोहिणी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

You might also like