Pune : महिलेच्या फेसबुक अन् इंस्टाग्रामचा पासवर्ड चोरला, मित्र-मैत्रीणींना व्हिडीओ कॉल, तरूणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेच्या फेसबुक व इंस्टाग्रामचे पासवर्ड चोरून त्याद्वारे मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून त्रास दिल्याचा प्रकार समोर आले आहे. तर त्या महिलेचा पाठलाग देखील केला आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

याप्रकरणी ऋषिकेश नितीन पवार (वय २९, रा. शिवीजीनगर गावठाण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी तोंड ओळखीचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी हा फिर्यादी यांचा पाठलाग करून त्रास देत होता. तसेच, प्रत्यक्ष भेटून व फोनवर बोलण्याचा आग्रह धरत होता. तर फोन न उचलल्यास आयुष्य उध्दवस्त करण्याची धमकी देत. तसेच, त्यांच्या नवऱ्याची बदनामी करण्याचीही धमकी देत होता.

यानंतर आरोपीने महिलेच्या फेसबुक व इंन्स्टाग्रामचे पासवर्ड चोरले. त्यांच्या अकाउंटवरून त्यांच्या मित्र, मैत्रिणींनी व्हिडिओ कॉल करून त्रास दिला. या सर्व प्रकाराला फिर्यादी या खूप वैतागल्या होत्या. अखेर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.