लष्कर न्यायालयातच महिलेला ‘धक्काबुक्की’ अन् ‘शिवीगाळ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घटस्फोटाच्या दाव्याच्या तारखेला आलेल्या एका महिलेला पतीने लष्कर न्यायालयातच धक्काबुक्कीकरून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचा 2015 साली विवाह झाला आहे. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर पतीचे आई-वडिल, बहिण व फिर्यादींची नंदई या घरघुती कारणावरून त्यांना सतत टोमणे मारत असत. त्याचदरम्यान त्यांनी एटीएम आरोपींकडून परत घेतल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. यात्राला कंटाळून त्यांनी पती तसेच इतरांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर 498 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांनी लष्कर न्यालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी त्यांची न्यायालयात तारीख होती. त्यामुळे दोघेही लष्कर न्यायालयात आले होते. यावेळी त्या वॉशरूमला गेल्यानंतर आरोपी व इतर तेथे आले. त्यांना आमच्याविरोधात तक्रार देऊन काही उपयोग होणार नाही. तुला कोणाकडे जायचे ते जा. न्यायालयात चक्करामारून काही होणार नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच, त्यांना धक्काबुक्की करून त्यांना बेकायदेशीर तलाक दिला. तसेच, मी दुसरे लग्न करत असल्याचे सांगत धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक कुलाळ हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?