पुणे : हुंड्यासाठी सुनेचा गळा आवळून खून, ४ जणांना अटक

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे सासरच्या मंडळींनी सुनेचा हुंड्यासाठी दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. मंचर पोलिसांनी याप्रकरणी पती, सासू आणि दिराला अटक केली आहे.
पूनम स्वप्निल ढमाले (वय-२३ रा. आंबेगाव) असे खून करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. तर पती स्वप्निल भरत ढमाले, सासू संगीता भरत ढमाले, दीर सुमित भरत ढमाले, निखिल भरत ढमाला यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B071D4MP9T,B071DF6BWQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c472508e-c30c-11e8-9c8b-0d27c6f11699′]
पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी पूनम हिने आत्महत्या केली असल्याची माहिती मंचर पोलिसांना दिली होती. मात्र, पूनमच्या घरच्यांना याचा संशय आल्याने त्यांनी पूनमचा खून झाला असल्याची शक्यता वर्तविली होती. पोलिसांनी पूनमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन आहवालानुसार पूनम हिचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.
पूनम आणि स्वप्नील यांचे लग्न ८ महिन्यांपूर्वी झाले होते. पूनमचा पती चायनीज गाडीवर फळे विक्री करण्याचा व्यवसाय करतो. लग्नानंतर सासरच्या लोकांनी माहेराहून हुंडा घेऊन येण्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पती आणि सासरच्या इतर मंडळींनी तिला व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी तिचा छळ केला. याच कारणावरुन गुरुवारी (दि.२७) सकाळी दहाच्या सुमरास त्याच्यात वाद झाले. याच वादातून पूनम हिचा गळा आवळून खून करण्यात आला.
[amazon_link asins=’B01HQ4O12A,B078ZS7DXW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cbf4830-c30d-11e8-99df-ad37355c3e58′]
पूनम हिचा खून करुन ती आत्महत्या असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याच प्रयत्न केला. मात्र पूनमचे वडिल भीमाजी सैद यांनी आपली मुलगी आत्महत्या करु शकत नाही, तिचा खून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली होती. याच आधारावर पोलिसांनी तपास करुन आणि शवविच्छेन आहवालानुसार चौघांना अटक केली. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.