पुणे : ‘निर्भया’ पथकातील महिला पोलिसांना रोडरोमीयोंकडून मारहाण

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींना रोडरमीयोंकडून त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. रोडरोमीयोंच्या त्रासाला वैतागून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. यानंतर मुलींच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुलींच्या संरक्षणासाठी ‘निर्भया’ पथक तयार करण्यात आले. मात्र, याच पथकातील महिला पोलीस कर्मचारी सुरक्षीत नसल्याचे आजच्या घटनेवरुन दिसून येत आहे. आज (शनिवार) सकाळी अकराच्या सुमरास बारामती एमआयडीसी परिसरामध्ये ‘निर्भया’ पथकातील महिला पोलीस व सोबतच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेल्या या पथकाच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9874d525-be73-11e8-9532-810ce362589e’]

याप्रकरणी आरोपी विजय गोफणे (रा. वंजारवाडी  ता. बारामती) याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17de4bd4-be77-11e8-825d-2723fa9a07b4′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२२) सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या रस्त्यावर आरोपी गोफणे याने मुलांना सोबत घेऊन रस्ता अडवला होता. यामुळे निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी रस्त्यात असे थांबू नका असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या आरोपीने महिला पोलिसांनाच उद्धट भाषा वापरून, शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच महिला पोलिसाचा हात पिरगळत व कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून पथकातील इतर पोलीस सहकारी त्यांना सोडविण्यासाठी धावले. यावेळी आरोपीने त्यांनाही जबर मारहाण केली. यावेळी पोलीस पाठलाग करत असताना आरोपी गोफणे हा तेथून फरार झाला.

शुक्रवारी इंदापूरच्या महाविद्यालयाच्या समोर रिक्षात गॉगल घालून मुलींच्या मागे टोमणे मारणाऱ्या एकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पथकाच्या महिला पोलिसालाच मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती.

पिंपरी | उच्चभ्रू कुटुंबाकडे खंडणी मागणारे दोन इंजिनियर वाकड पोलिसांच्या जाळ्यात 

पथकाला मिळाला होता प्रथम क्रमांक
मागील दोन वर्षात बारामती विभागाच्या निर्भया पथकाने बारामती व इंदापूर तालुक्यात दीड हजार रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. पथकाच्या कारवाईच्या धडाक्यामुळे रोडरोमिंओंवर चांगला जरब बसला आहे. त्याची दखल घेत पथकाला पुणे जिल्हयात सर्वोतम कामगिरीबाबत प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मात्र ,आज घडलेल्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.