Pune : एकट्या दुकट्यानं कामे होत नाहीत, सर्वांना सोबत घ्यायचे असतं, खासदार बापट यांचा ‘इशारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकट्या दुकट्याने कामे होत नाहीत, सर्वांना सोबत घेऊन कामे पुढे न्यावी लागतात. यापुढे मी महापालिकेच्या कामात लक्ष देणार असून भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणार आहोत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण केले जाईल, या कामात अडथळे आणणाऱ्या कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा देत खासदार गिरीष बापट यांनी सूचक इशारा दिला आहे.

शहरातील प्रलंबित विकासाकामा संदर्भात खासदार बापट यांनी आज महापालिकेत अधिकारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, भाजपचे सरचिटणीस नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह आमदार व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट यांनी माहिती दिली.

बापट म्हणाले, की महापालिका विविध विकास कामे करत आहे. काही सुरू काहींची गती कमी. कोरोना मुळे परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, त्यामुळे कामांना गती मिळेल. यासाठी आज बैठक घेतली.

यापुढील काळात शहरातील 4 – 5 प्रकल्पात मी अधिक लक्ष घालायचे ठरवले आहे. कचरा प्रश्न, स्मार्ट सिटी, नदिसुधार योजना या योजनांत प्रामुख्याने लक्ष देणार आहे. आज 24 तास पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. पुढील वर्षभरात सर्व आश्वासन किंबहुना जाहीरनामा पूर्ण करू. यासाठी केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू.

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवरील चर्चे दरम्यान टाक्या, केबल डकट, पाईप लाईनची कामे अशी चर्चा झाली. 82 ते 84 टाक्या पूर्ण करायच्या आहेत. वनखाते, खासगी जागा, व कायदेशीर अडचणीमुळे कामे रखडली आहेत. आतापर्यंत टाक्यांचे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाईप लाईनचे 750 किमीचे काम होणे अपेक्षित होते. पण 300 की. मी. चेच काम झाले आहे. अरुंद रस्ते, व तांत्रिक अडचणीमुळे केवळ 17 टक्के काम होऊ शकले आहे. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. मीटर साठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. दिरंगाई झाली तर अपव्यय वाचवू शकणार नाही. 8 टक्के काम झाले आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

तर कोणाची गय केली जाणार नाही
एकट्या दुकट्याने काम होत नाही, सर्वांना सोबत घेऊन कामे होतात. जे लोकप्रतिनिधी टाक्या, व पाईपलाईन च्या कामात अडथळा आणतील त्यांची गय केली जाणार नाही, असे बापट म्हणाले.